मंगळवार, ३० जून, २०१५

गालात हसणे तुझे ते

गालात हसणे तुझे ते
कधी मला कळलेच नाही
भोवती असणे तुझे ते
कधी मला उमजलेच नाही


येतसे वारा घेउन कधी
चाहूल तुझी येण्याची
कधी साद पडे कानी
तुझ्या छनन छन पैजणांची


कधी अबोला धरसी तु
लटकेच रागवुन पाहणे
कधी गुदगुल्या अंगावरती
अन केव्हा मोहक हसणे

अल्लड निरागस अवघी तु
चैतन्याचा बहार होती
यौवन तुझे अवीट लोभस
मदन कांतीचा पुतळा होती

इतका अबोला कसला धरला
सोडुन कुठे मजला गेली
तुझीच चाहुल भासते काधी
येताच झुळुक मंद ओली

मी अभागा इतका कसा
कसे मला उमजलेच नाही
गालात हसणे तुझे ते
कधी मला कळलेच नाही


कवि : दत्ता हुजरे
संग्रह : कवि मन माझे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा