सोमवार, १२ डिसेंबर, २०११

थेंब दवाचे

झोपलेल्या पाण्यावर
थेंब दवाचे साचलेले
विरघळुन गेले कधी 
पाण्यालाच न कळले



रम्य पहाट न जाणो
सर्व स्वप्नांपरी बिलगलेले
धरतीवर सडा टाकती
थेंब दवाचे आसुसलेले


कमळाच्या पाकळ्यावरून
पाणी जरी ओघळले
तरी थेंब दवाचे गोलमटोल
डौलदारपणे साचले


बहरलेली धरती अन 
गवत हे विसावलेले
रम्य अशा पहाटी
दवामृत हे प्याले


नवसंजीवनीच्या गारव्यातुन
रोम रोम खुलुन आले
निद्रेत विसावलेले कालचे
साखरझोपेत लीन झाले


मोतीबिंदू झाले दवाचे
सुर्यनारायणाचे किरण आले
प्रकाशाच्या लखलखाटाने
दवाचे चमकते हिरे झाले


सप्तध्नुचे अंतरंग
दवांमध्ये प्रकट झाले
उधळुन रंग सारे
भुतलावर पसरले


तापता हा सुर्य
दव त्यात विरुन गेले
आयुष्याच्या अंतीही
गारवा हा सोडुन गेले



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा